Join us

​मदर सोफियाचा युटर्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 11:28 IST

मदर सोफिया म्हणून सध्या नावारूपाला आलेली मॅाडेल सोफिया हयातने पुन्हा तिचा सेक्सी अवतार दाखवायला सुरूवात केलीय, काही दिवसांपूर्वी तिने ...

मदर सोफिया म्हणून सध्या नावारूपाला आलेली मॅाडेल सोफिया हयातने पुन्हा तिचा सेक्सी अवतार दाखवायला सुरूवात केलीय, काही दिवसांपूर्वी तिने 'नन' बनल्याची घोषणा केली होती. आयुष्यात आलेल्या नैराश्यापुढे तिला तिचे आयुष्य संपवावेसे वाटते होते.मात्र अचानक असं काही घडलं की ही सेक्सी मॅाडेल एका रात्रीत नन बनल्याचं समोर आले. याविषयी सोफियाने अधिकृत घोषणा देखील केली होती. मात्र आता अचानक सोफियाने युटर्न घेतल्याचे समोर आलंय. काही दिवसांपूर्वी सोफियाने इंस्टाग्रामवर तिचे सेक्सी फोटो अपलोड केले आहेत. यावरून पब्लिसिटी मिळवण्यासाठी आणि सतत चर्चेत राहण्यासाठी सोफियाने धर्माचा अपमान केल्याची टीका तिच्यावर होतेय.सोफियाचा 'सिक्स-एक्स' हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार आहे. सोफियाने मोठ्या उत्साहात नन बनल्याची घोषणा केली होती.मात्र तिचे सोशल मीडियावरचे फोटो पाहता तिने नन बनल्याचे ढोंग केल्याचे उघड झालंय. हा फोटो अपलोड केल्यानंतर स्टेटमध्ये  लिहीलयं की खूप दिवसानंतर तिने मेकअप केलाय. नन बनल्यानंतरही मध्ये सोफियाने तिचे आंघोळीचे असे फोटो अपलोड केले होते. सोफियाचे वेगवेगळ्या फोटोवरून  एकच  जाणवतेय  की,  तिला तिच्या ग्लॅमरस  जगात पुन्हा परतयाच आहे.