Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई म्हणते,‘...तेव्हा करणार प्रियंका लग्न!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 12:10 IST

तुम्ही प्रियंका चोप्राचे फॅन आहात का? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बॉलीवूडमध्ये सध्या अनेकांचे लग्न होत आहेत. आणि दुसरीकडे ...

तुम्ही प्रियंका चोप्राचे फॅन आहात का? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बॉलीवूडमध्ये सध्या अनेकांचे लग्न होत आहेत. आणि दुसरीकडे घटस्फोटही तेवढ्याच फास्ट होत आहेत.अशावेळी लग्नाचे योग्य वय कोणते आणि केव्हा केले पाहिजे यावर एका मुलाखतीदरम्यान बोलताना प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा म्हणाली,‘ लग्न म्हणजे केवळ एक विधी नसून जन्मभरासाठी एकमेकांना देण्यात आलेले ते वचन असते.प्रियंका तेव्हाच लग्न करेल जेव्हा तिच्याकडे ते नातं टिकवण्यासाठी वेळ असेल. आज मी पाहते त्याप्रमाणे लोकांकडे त्यांचे नाते समृद्ध करण्यासाठी वेळच नाही.जेव्हा पीसी नाते जपण्याच्या आणि ते वृद्धिंगत करण्याच्या मानसिकतेत असेल तेव्हाच ती लग्न करेन. वयाच्या ठराविक स्टेजला लग्न करणे हा काही योग्य विचार होऊ शकत नाही. ’ असे त्यांनी जाहीर केले.