Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोरक्कोत कॅट, रणबीर आणि ‘वो’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 12:46 IST

मोरक्कोमध्ये सध्या बॉलीवुडचे एक्स लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आगामी 'जग्गा जासूस' या सिनेमाचं शुटिंग करतायत. मात्र याच ...

मोरक्कोमध्ये सध्या बॉलीवुडचे एक्स लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आगामी 'जग्गा जासूस' या सिनेमाचं शुटिंग करतायत. मात्र याच शूटिंगवेळी असं काही घडलं की चिकनी चमेली सध्या सेटवर उदास उदास असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचं झालं असं की या शूटिंगच्या वेळी अचानक एंट्री झाली ती रणबीरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची.. कॅटशी ब्रेकअप झाल्यापासून सावरियाँ या आपल्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडच्या खूप जवळ गेलाय.. त्यामुळंच की काय या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडला रणबीरपासून थोडाही दुरावा सहन होत नसल्यामुळे तिनं थेट गाठलं मोरक्को आणि धडकली जग्गा जासूसच्या सेटवर. आता ही दिल्लीवाली गर्लफ्रेंड म्हणजे कोण असा प्रश्न पडला असेल.. तर ती आहे रणबीरची बहिण रिद्धीमा कपूरची मैत्रीण.. तिचं नाव भारती मल्होत्रा असल्याचं समजतंय.सेटवर भारतीची एंट्री झाली आणि चिकनी चमेलीच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक्स बॉयफ्रेंडला दुस-या मुलीसोबत पाहून कॅटची अवस्था दिल के तुकडे हजार अशीच काहीशी झाली असावी.