‘रॉक आॅन २’ जास्त चॅलेंजिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:42 IST
अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या आगामी ‘रॉक आॅन २’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या टिझर लाँच होण्याप्रसंगी तो म्हणाला,‘ हा चित्रपट साकारणे म्हणजे ...
‘रॉक आॅन २’ जास्त चॅलेंजिंग
अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या आगामी ‘रॉक आॅन २’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या टिझर लाँच होण्याप्रसंगी तो म्हणाला,‘ हा चित्रपट साकारणे म्हणजे खरंच एक आव्हान होते. सिक्वेल काढणे हे खरंतर एक चॅलेंजच असते.अगोदरच्या चित्रपटातील काही प्रश्नांची उत्तरे सिक्वेलमध्ये मिळालीच पाहिजेत. ‘रॉक आॅन’ ची टीमच आताही सोबत असल्याने आमच्या आठवणी ताज्या झाल्या. टीमसोबत पुन्हा एकदा काम करायला फार छान वाटले.सिक्वेलचा आणखी एक फायदा असा की, मोठ्या जोमात कलाकार पुन्हा एकदा त्याच प्रामाणिकपणे काम करण्यास तयार होतात.’ यात प्राची देसाई, फरहान, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर हे असतील.