जॉनने शिलगावल्या ६०० पेक्षा अधिक सिगारेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 20:24 IST
अभिनेता जॉन अब्राहम अभिनीत ‘ढिशूम’ लवकरच येतोय. यात जॉनने पोलिस अधिकारी ‘कबीर’ची भूमिका साकारली आहे. यात कबीर चेन स्मोकर ...
जॉनने शिलगावल्या ६०० पेक्षा अधिक सिगारेट!!
अभिनेता जॉन अब्राहम अभिनीत ‘ढिशूम’ लवकरच येतोय. यात जॉनने पोलिस अधिकारी ‘कबीर’ची भूमिका साकारली आहे. यात कबीर चेन स्मोकर दाखवलेला आहे. या भूमिकेत जीव फुंकायसाठी जॉनने रोज जवळजवळ २० सिगरेट शिलगावल्या. अर्थात यापैकी एकही खरोखर ओढली नाही. कारण?? अहो, जॉनने सुमारे १० वर्षांपूर्वीच धूम्रपान सोडले आहे. चित्रपटात जॉनची भूमिका चेन स्मोकरची होती. म्हणून त्याने सिगरेट तर शिलगावली पण ओढली मात्र एकही नाही. कुणालाही धूम्रपानासाठी प्रोत्साहित करणे आमचा उद्देश नाही, असेही जॉन म्हणाला. ‘ढिशूम’ हा कबीर व जुनैद या दोन पोलिस अधिकाºयांची कथा आहे. जुनैदची भूमिका वरूण धवन साकारत आहे. जॅकलीन फर्नांडिस व अक्षय खन्ना हे दोघेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.