Monsoon Shootout Trailer! बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा रिलीज झाला असा ट्रेलर; विश्वास बसत नसेल तर पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:49 IST
होय, बॉलिवूडचा हा पहिला इंटरेक्टिव ट्रेलर आहे, जो प्रेक्षकांना विचार करण्यासाठी वेळ देणार आहे. शिवाय निवडलेल्या पर्यायानुसार, तुम्ही स्वत: या ट्रेलरचा शेवट ठरवणार आहोत.
Monsoon Shootout Trailer! बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा रिलीज झाला असा ट्रेलर; विश्वास बसत नसेल तर पाहाच!!
आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला तीन मार्ग येतात. एक योग्य, एक अयोग्य आणि एक मध्यम. अनेकदा निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो. नेमका हा अटीतटीचा हा क्षण गोठवून टाकता आला तर? हा क्षण फ्रिज करून काही क्षण विचार करण्याची उसंत आपल्याला मिळाली तर? प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला ही उसंत मिळो ना मिळो. पण ‘मान्सून शूटआऊट’चा ट्रेलर मात्र तुम्हाला ही उसंत दिली आहे. होय, बॉलिवूडचा हा पहिला इंटरेक्टिव ट्रेलर आहे, जो प्रेक्षकांना विचार करण्यासाठी वेळ देणार आहे. शिवाय निवडलेल्या पर्यायानुसार, तुम्ही स्वत: या ट्रेलरचा शेवट ठरवणार आहोत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मान्सून शूटआऊट’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वी रिलीज झाला. इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्रा हिने ‘मान्सून शूटआऊट’चा ट्रेलर लान्च केला. ‘शूट आऊट आॅर नॉट’? असा प्रश्न या ट्रेलरमध्ये विचारला जातो आणि तुम्ही जो पर्याय निवडाल, त्याप्रमाणे तुम्हाला ट्रेलरचा दुसरा भाग दिसतो. अर्थात पहिल्याऐवजी मी दुसरा पर्याय निवडला असता तर ? असा एक प्रश्न तुम्हाला यावेळी पडतोच पडतो. म्हणजेच या ट्रेलरमध्ये तुमच्या चॉईसनुसार, दोन वेगवेगळे पैलू पाहण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये असा कॉन्सेप्ट वापरला गेला नाही. ‘मान्सून शूटआऊट’च्या ट्रेलरमध्ये हा युनिक कॉन्सेप्ट दिसणार आहे.ALSO READ : नवाजुद्दीन सिद्दीकीने मागितली पूर्वप्रेयसींची माफी; बायोग्राफी घेतली मागे!अमित कुमार दिग्दर्शित हा चित्रपट एक क्राईम थ्रीलर ड्रामा आहे. चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २०१३ मध्ये कान्समध्ये या चित्रपटचा प्रीमिअर झाला होता. बॉक्सआॅफिसवर रिलीज होण्यापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट थ्रीलर चित्रपटाचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. त्याच्याशिवाय विजय शर्मा, नीरज कबी आणि तनिष्ठा चॅटर्जी यात मुख्य भूमिकेत आहेत. बॉक्सआॅफिसवर ‘कुलदीप पटवाल: आय डिडन्ट डू इट’, ‘माय फ्रेड्स दुल्हनिया’ आणि अॅनिमेशन फिल्म ‘द बुल’सोबत या चित्रपटाचा संघर्ष रंगणार आहे.