Join us

डॉन अबू सालेमची एक्स गर्लफ्रेन्ड मोनिका बेदीचा लेटेस्ट लूक पाहून फॅन्स अवाक्, आधीपेक्षा आता जास्त दिसते ग्लॅमरस..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 14:32 IST

Monika Bedi : सालेमने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना धमक्या देऊन तिला कामं मिळवून दिली. याचा खुलासा हुसैन जैदी यांनी त्यांच्या 'माय नेम इज अबू सालेम' पुस्तकात केली आहे.

Monika Bedi : मोनिका बेदी 90च्या दशकातील अनेक सिनेमात दिसली होती. अनेक गाजलेल्या सिनेमात तिने काम केलं. पण अभिनेत्री म्हणून तिला फार काही यश मिळू शकलं नाही. पण डॉनसोबत रिलेशनशिपमुळे ती जगभरात फेमस झाली. मोनिका बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होती तेव्हा डॉन अबू सालेमची नजर पडली होती. सालेमने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना धमक्या देऊन तिला कामं मिळवून दिली. याचा खुलासा हुसैन जैदी यांनी त्यांच्या 'माय नेम इज अबू सालेम' पुस्तकात केली आहे.

मोनिका बेदी  सध्या सिनेमात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव आहे. ती योगा आणि तिच्या एक्सरसाइजचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यात ती फारच ग्लॅंमरस दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या फॅन्सना खूपच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्सही आहेत.

मोनिका बेदी आणि अबू सालेम यांची 90च्या दशकात चांगलीच चर्चा झाली. मोनिकाही अबू सालेमच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत पोर्तुगालमध्ये राहत होती. नंतर प्रत्यार्पण करून त्याला भारतात आणलं गेलं. मोनिकाला भोपाळ येथील तुरूंगातही राहवं लागलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर तिने अबू सालेमसोबतचं नातं तोडलं आणि हा केवळ एक अपघात होता असं एका मुलाखतीत सांगितलं. 

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील चब्बवाल गावात जन्माला आलेला मोनिकाचे आई-वडील नॉर्वेमध्ये गेले. आणि मोनिकाचं शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालं. तिचा पहिला सिनेमा ताजमहाल होता. त्यानंतर 1995 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं.

मोनिकाला पहिला ब्रेक जानम समझा करो मध्ये अबू सालेममुळेच मिळाला होता. राजकुमार संतोषीवर दबाव टाकल्यावर तिला छोटा रोल देण्यात आला होता. यात सलमान खान आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी