Monalisa Farman Khan Honeymoon : कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिने फरमान खान याच्यासोबत लग्न केले. हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला गेल्याने त्यांचे लग्न वादात सापडले. मोनालिसा आणि तिचा पती फरमान यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला असला, तरी हा वाद थांबलेला नाही. आता मोनालिसा सध्या तिच्या हनिमूनच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. मुस्लिम प्रियकर फरमान खान याच्याशी केरळमधील एका मंदिरात विवाहबंधनात अडकल्यानंतर, ही जोडी सध्या केरळच्या निसर्गरम्य वातावरणात हनिमूनचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
मोनालिसाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती फरमानसोबत समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. मोनालिसा काळ्या आणि क्रीम रंगाचा शर्ट आणि ग्रे पँट या लूकमध्ये आहे. तर फरमान वेस्ट आणि फाटलेल्या जीन्समध्ये दिसत आहे. "केरळमध्ये मजा करत आहोत" असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले.
मोनालिसाने हे लग्न आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध केले आहे. तिच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते आणि त्यांनी या लग्नाला 'लव्ह जिहाद' असे संबोधले. मात्र, या आरोपांवर मोनालिसा आणि फरमानने स्पष्ट भूमिका मांडली आहे. "आमच्यात कोणताही लव्ह जिहाद नाही. आम्ही दोघे कलाकार आहोत आणि आमचा सर्व धर्मांवर विश्वास आहे. आम्ही कुणीही आपला धर्म बदललेला नाही" असे त्यांनी ठामपणे सांगितले.
फरमान आणि मोनालिसा यांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोनालिसा केरळला गेली आणि तिथे हिंदू रितीरिवाजानुसार तिने फरमानशी लग्न केले. यावेळी फरमानने तिच्या कपाळावर कुंकू लावून या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
Web Summary : Monalisa Bhosle, who married Farman Khan after a viral Kumbh Mela appearance, is honeymooning in Kerala. Their marriage sparked 'love jihad' accusations, which they denied. The couple's beach photos are now circulating, showing them enjoying their time together despite family objections.
Web Summary : कुंभ मेले में वायरल मोनालिसा भोसले ने फरमान खान से शादी की और केरल में हनीमून मना रही हैं। उनकी शादी पर 'लव जिहाद' के आरोप लगे, जिसका उन्होंने खंडन किया। परिवार के विरोध के बावजूद, युगल की तस्वीरें वायरल हो रही हैं।