‘मोहेंजोदारो’ केवळ १५० मिनिटांचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 16:29 IST
cnxoldfiles/span> ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच उत्सूकता निर्माण केली आहे. अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या मुख्य ...
‘मोहेंजोदारो’ केवळ १५० मिनिटांचा
cnxoldfiles/span> ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच उत्सूकता निर्माण केली आहे. अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा कालावधी केवळ १५० मिनिटांचा असणार आहे. केवळ १५० मिनिटांचा यासाठी की, आशुतोषचे याआधीचे चित्रपट बघता हा कालावधी बराच कमी आहे. आशुतोषचा ‘लगान’ २३४ मिनिटांचा होता. ‘स्वदेश’ २१० मिनिटांचा, जोधा अकबर २१४ मिनिटांचा तर व्हॉट्स युअर राशी २१३ व खेले हम जी जान से १६८ मिनिटांचा होता. आता मात्र आशुतोषचे आगामी चित्रपटाचा कालावधी बराच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.