Join us

​मोहेंजोदडो गोवारीकर यांचा सर्वात छोटा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 20:46 IST

 निर्माता आशुतोष गोवारीकर यांना जास्त वेळ चालणारा चित्रपट तयार करणारे निर्माते म्हणून ओळखले जाते. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा जास्त ...

 निर्माता आशुतोष गोवारीकर यांना जास्त वेळ चालणारा चित्रपट तयार करणारे निर्माते म्हणून ओळखले जाते. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा जास्त वेळ चालणारा असतो. ‘लगान’, ‘स्वदेश’ व ‘जोधा अकबर’ हे गोवारीकर यांचे जास्त वेळ चालणारे चित्रपट होते. त्यांच्या  ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा असून, तो लवकरच  प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आपल्यालाही हा चित्रपट जास्त वेळ चालणारा वाटत असेल. परंतु, त्यांचा मोहेजोदडो हा केवळ अडीच तास चालणारा आहे.या चित्रपटाचा वेळ कमी असल्यानेच हृतिकने त्याचा स्वीकार केला आहे. हे स्वत: हृतिकनेच मोहेजोदडोच्या प्रमोशनदरम्यान सांगितलेले आहे. लगान हा ३ तास ५४ मिनीटे चालणारा चित्रपट होता. स्वदेश सुद्धा अडीच तास चालणारा होता. जोधा अकबरासह गोवारीकर यांचे अन्य चित्रपटही अधिक वेळ चालणारे होते. त्यामुळे मोहेंजोदडो हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात कमी वेळ चालणारा चित्रपट आहे.