‘मोहनजोदडो’ कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 16:25 IST
आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असून, पूजा हेगडे ही पदार्पण करीत आहे. चित्रपटात कबीर बेदीसुद्धा आहे. ...
‘मोहनजोदडो’ कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल
आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असून, पूजा हेगडे ही पदार्पण करीत आहे. चित्रपटात कबीर बेदीसुद्धा आहे. येत्या १२ आॅगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आपल्या कारकीर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल, अशी अपेक्षा हृतिक रोशनला आहे. ‘मी त्या काळात रमलो आणि या चित्रपटात काम करताना खूप अनुभव आला. मला विश्वास आहे, माझ्या कारकीर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल आणि प्रेक्षकही माझ्या मताशी सहमत होऊन चित्रपट पाहतील, असेही हृतिक म्हणाला. २००८ साली आलेल्या जोधा अकबर नंतर आशुतोष दुसºयांदा हृतिकसोबत काम करतो आहे.