Join us  

'मोहब्बतें'मधून एकारात्री स्टार झाली किम शर्मा, युवराज सिंगसोबतच्या अफेअरमुळे होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 11:48 AM

करिअरपेक्षा किम तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन जास्त चर्चेत राहिली.

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट सिनेमा  'मोहब्बतें'पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री किम शर्माचा जन्म 21 जानेवारी 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. 'तुम से अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'कहता है दिल बार-बार' आणि 'जिंदगी रॉक्स' या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवता आले नाही. करिअरपेक्षा किम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिली. 

2003 मध्ये किम आणि क्रिकेटर युवराज सिंगच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यांचे जवळजवळ चार वर्षे अफेयर होते, परंतु त्यानंतर त्यांचे रस्ते वेगळे झाले. 2007 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर किम शर्माने २०१० मध्ये बिझनेसमन अली पंजानीशी लग्न केले आणि मुंबई सोडली. ती केनियामध्ये स्थायिक झाली. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. किमचे नाव 'रॉक ऑन' चे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि डिझायनर अर्जुन खन्ना यांच्याशीही जोडले गेले आहे.

डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा हर्षवर्धन व किम यांच्या डेटींगच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर बाईक राईडपासून ते हॉलिडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे कपल एकत्र दिसू लागले होते. मात्र त्यांचे हे नाते फार दिवस तग धरु शकले नाही. दोघांचे ब्रेकअप झालं. 

टॅग्स :किम शर्मा