Join us

​मिथुन दा गंभीर दुखण्याने बेजार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:33 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती अर्थात मिथुन दा यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मिथुन दा ...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती अर्थात मिथुन दा यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मिथुन दा गंभीर आजारी आहेत. मिथुन यांचे मॅनेजर विजय यांनी दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दादांची प्रकृती ठीक नाही. उपचारासाठी त्यांना लॉस एंजिल्सला हलवण्यात आले आहे, असे विजय यांनी सांगितले. मिथुन बºयाच दिवसांपासून लाईम लाईटपासून दूर आहेत. त्यामागचे कारण आत्ता कुठे समोर आले आहे. सध्या मिथुन दा अमेरिकेत विश्रांती करत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी उपचारासाठी ते अमेरिकेला गेलेत. पण आता कधी परततील, हे निश्चित नाही. त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर आहे. यामुळे त्यांना असह्य वेदना होत आहेत. यासाठी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तूर्तास तरी दादांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.कसे झाले  फ्रॅक्चर ?सन २००९ मध्ये इमरान खान व श्रुति हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लक’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मिथून दा यांना दुखापत झाली होती. एका सीनदरम्यान त्यांना हेलिकॉप्टरमधून उडी घ्यायची होती. यादरम्यान गफलत झाली आणि तेव्हापासून मिथून दा यांना पाठीच्या दुखण्याने ग्रासले.