Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिथुन चक्रवर्ती यांची लेक दिशानी चक्रवर्ती अचानक आली चर्चेत! काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:08 IST

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती अखेर बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत दिशानीच्या बॉलिवूड ...

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती अखेर बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत दिशानीच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अर्थात अद्याप दिशानीच्या  डेब्यूची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार, असे कळतेय. दिशानी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज आपले नव नवे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोतील तिच्या अदा पाहून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास ती अगदी तयार असल्याचे दिसतेय. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीत अ‍ॅक्टिंग शिकतेय. याचाही अर्थ स्पष्ट आहे, दिशानीचा प्रवास बॉलिवूडच्या दिशेनेच सुरू झालायं. आता केवळ तिच्या डेब्यू चित्रपटाची अधिकृत घोषणा होण्याची तेवढी प्रतीक्षा आहे.आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की, दिशानी ही मिथुन यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मिथुन यांना एका कचराकुंडीत  दिशानी सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता.त्या रस्त्यावरून अनेकजण गेलेत. पण जीवाच्या आकांताने रडणा-या त्या चिमुकलीला पाहून कुणाचेही हृदय द्रवले नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आणि मिथुनने नेमकी ही बातमी ऐकून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.  ALSO READ : मिथुन चक्रवर्तीने वैतागून श्रीदेवीच्या हातून बांधून घेतली होती राखी !!या चिमुकलीला दत्तक घेतल्यानंतर मिथुनने तिचे नाव दिशानी ठेवले. मिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले.यानंतर मिथुनने दिशानीला दत्तक घेतले आणि केवळ दिशानीचेच नाही तर मिथुनचेही आयुष्य बदलले. दिशानी प्रचंड स्टाईलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्या आहेत. दिशानीऐवजी मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत.