Join us

मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत सुधारताच पुन्हा केली कामाला सुरुवात, मसुरीमध्ये करतायेत चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:44 IST

मिथुन यांना फूड पॉयझनिंग झाल्याने काही दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

ठळक मुद्देमिथुन चक्रवर्ती यांनी मसुरी येथे पुन्हा चित्रीकरण करायला सुरुवात केली आहे. पण ते द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नव्हे तर एका वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी मसुरीत दाखल झाले आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द कश्मीर फाइल्स' नावाचा एक सिनेमा करत आहे. यात अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं शूटींग मसुरीत सुरू असताना अचानक मिथुन चक्रवर्ता आजारी पडले होते. त्यांना फूड पॉयझनिंग झाल्याने काही दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण आता त्यांची तब्येत सुधारली असून त्यांनी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी मसुरी येथे पुन्हा चित्रीकरण करायला सुरुवात केली आहे. पण ते द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नव्हे तर एका वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी मसुरीत दाखल झाले आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा करत असून त्याने याआधी राणी मुखर्जीच्या हिचकी या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या वेबसिरिजमध्ये श्रुती हासन, अन्नू कपूर, अर्जुन बाजवा, गौहर खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मिथुन चक्रवर्ती पहिल्यांदाच वेबसिरिजमध्ये काम करत आहेत. 

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने मिथुन यांच्या आजारपणाबद्दल सांगितले होते की, 'आम्ही लोक एक अ‍ॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू होतं. पण फुड पॉयझनिंग झाल्यामुळे मिथुन आजारी पडले होते. कोणताही सामान्य माणूस अशा स्थितीमध्ये उभा देखील राहू शकत नाही. पण अशा स्थितीतही ते बाहेर आले आणि त्यांनी त्यांचा पूर्ण सीन शूट केला. कदाचित यामुळे मिथुन सुपरस्टार आहेत'. मिथुन यांची तब्येत पाहून मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी मला सांगितलं की, ते आजारी नाहीत. ते सतत मला शूटींगबाबत विचारत होते. मिथुन दा या वयातही आपल्या कामावर फार लक्ष देतात. ते फार मेहनती आणि प्रोफेशनल आहेत.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती