Join us  

सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 7:00 PM

Mithun chakraborty: सलमान आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मैत्री संपूर्ण बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळेच मिथुन यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती(mithun chakraborty). उत्तम अभिनय आणि हटके डान्स स्टाइल यांच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्री गाजवली. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. यात सलमान खान आणि त्यांची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांच्यातील मैत्री दिसून येते. परंतु, मिथुन यांनी सलमानच्या (salman khan) लग्नाविषयी एक मोठं विधान केलं आहे. ज्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

सध्या सोशल मीडियावर मिथुन आणि सलमान यांचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. 'लकी: नो टाइम फॉर लव' हा सिनेमा रिलीज होण्याच्यावेळी मिथुन यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सलमानचं लग्न, त्याचं सेटवरचं वागणं यांसारख्या विषयावर एकंदरीत भाष्य केलं होतं.

सलमान खान, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि अक्षय कुमार यांच्यापैकी कोणासोबत स्क्रीन शेअर करतांना जास्त त्रास झाला?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सलमानचं नाव घेतलं. "तो खूप मस्तीखोर आहे. पण, त्याचं माझ्यावर तेवढंच प्रेम सुद्धा आहे. जर आम्ही दोघं सेटवर एकत्र असू तर एक सेकंदही शांत बसू शकत नाही. तो सतत मला शोधत फिरतो. जर मी झोपलो असेल तर मला उठवतो. आम्ही सेंट पीटर्सबर्गला एका सिनेमाच्या शुटिंगसाठी गेलो होतो. मी त्यावेळी माझ्या खोलीचं दार आतून बंद करुन झोपलो होतो आणि हा आत कसा काय आला माहित नाही. पण, मला उठवायला लागला", असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.

मिथुन यांचा हा किस्सा ऐकल्यावर आदित्य नारायणने त्यांना सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यावर, तो लग्न करणार नाही असं त्यांनी थेट सांगून टाकलं.

सलमानच्या लग्नाविषयी मिथुन यांचं थेट विधान

"सलमान कधीच लग्न करणार नाही. पण, तो लोकांना तत्वज्ञान वाटायचं काम बरोबर करतो. तो स्मार्ट, हुशार कलाकार असूनही त्याने अजून लग्न केलेलं नाही. हे ज्या मुलींना माहितीये त्यांच्या पैकी कोण अशी असेल जिला त्याच्यासोबत लग्न करायची इच्छा नसेल? पण, हा माणूस काही लग्न करणार नाही. मी गॅरेंटी देतो हा लग्न करणार नाही." दरम्यान, मिथुन यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. ते एखादवेळी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये दिसतात. तर, सलमान त्याच्या सिकंदर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानमिथुन चक्रवर्तीसेलिब्रिटीसिनेमाआदित्य नारायण