Join us

कव्हर पेजवर शाहरूख खान, नीता अंबानीसोबत झळकली मिताली राज; सोशल मीडियावर झाली ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 20:22 IST

काही दिवसांपूर्वीच मिताली तिच्या हटके अंदाजामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. आता पुन्हा एकदा ती यूजर्सच्या संतापाचा बळी पडली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज सध्या भलतीच चर्चेत आहे. मात्र जर तुम्ही असा विचार करीत असाल की, मिताली क्रिकेटमुळे चर्चेत आहे तर तुम्ही कदाचित चुकीचे ठरू शकता. कारण सध्या ती क्रिकेटपेक्षा बॉलिवूडमुळेच अधिक लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच मिताली तिच्या बायोपिकमुळे प्रकाशझोतात आली होती, परंतु आता ‘वोग’ साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर झळकल्याने ती चर्चेत आली आहे. होय, मिताली या साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि अंबानी ग्रुपच्या मालकीन नीता अंबानी यांच्यासोबत झळकत आहे. मितालीला ‘वोग वूमन आॅफ द इयर अवॉर्ड्स’च्या कव्हर पेजवर शाहरूख आणि नीता अंबानी यांच्यासोबत मिळालेले स्थान महत्त्वपूर्ण समजले जात आहे. परंतु ज्या अंदाजात मिताली कव्हर पेजवर झळकत आहे, तिचा तो अंदाज चाहत्यांना मात्र फारसा भावलेला दिसत नाही. मितालीच्या या फोटोवरून तिला ट्रोल केले जात असून, त्यास नेटकºयांकडून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वकप-२०१७ च्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भलेही भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्व कप जिंकू शकला नाही, परंतु मितालीने महिला क्रिकेटला मिळवून दिलेले महत्त्व वाखण्याजोगेच म्हणावे लागेल. मितालीने १९९९ मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तिने दहा कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत तिच्या नावे दुहेरी शतकाची नोंद आहे.  दरम्यान, कव्हरपेजवरील फोटोमध्ये मितालीने काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केले आहे. तिचे केस मोकळे असल्याने ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा बिनधास्त लूक मात्र काहींना फारसा भावला नाही. त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिच्या या फोटोचे कौतुकही केले. मितालीच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘कॅप्टन, तू खूपच सुंदर दिसत आहेस’ मितालीचा हा फोटो अभिनेत्री सोनम कपूर हिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. फोटो पोस्ट करताच २० तासांतच एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्यास लाइक आणि शेअर केले.  साप्ताहिकाच्या दुसºया पानावर अभिनेत्री प्रियंका चोपडा बघावयास मिळत आहे. तिच्यासोबत नाटालिया वोडियानोआ आणि पद्म लक्ष्मी बघावयास मिळत आहे. या तिघीही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत, तर तिसºया पेजवर ट्विंकल खन्ना, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर दिसत आहेत. असो, मितालीविषयी सांगायचे झाल्यास तिने तिच्या भविष्याविषयी आता मुड बदलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारण २३ जुलैला झालेल्या अंतिम सामन्यानंतरच तिने स्पष्ट केले होते की, ती पुढचा विश्वकप खेळू शकणार नाही.