‘मिर्झिया’चे नवे पोस्टर रिलीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:50 IST
बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...
‘मिर्झिया’चे नवे पोस्टर रिलीज !
बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता नुकताच ‘मिर्झिया’चा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. यात हर्षवर्धन आणि सैय्यामी हे प्रेमात आकंत बुडालेल्या जोडप्याप्रमाणे दिसत आहेत. ‘मिर्झिया’ साहिबान भूमिका साकारणारा हर्षवर्धन आणि सैय्यामी यांनी रोमॅण्टिक पोज दिलेली दिसते. तसेच, पोस्टरवर एक बाणही दिसतो. जो युद्धाच्या दरम्यान घडणाऱ्या या दोघांची प्रेम कहाणी कशी असेल हे सांगावयास पुरेसा आहे. आधी चित्रपटाचा ट्रेलर आणि कल्पकतेने तयार करण्यात आलेला पोस्टर पाहून प्रेमीयुगूल या चित्रपटाकडे नक्कीच आकर्षित होतील यात शंका नाही.आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर अनिल कपूर यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यावर त्यांनी म्हटलेय की, खऱ्या प्रेमाची कविता सांगणाऱ्या आणि प्रेमाच्या रंगांनी परिपूर्ण असा ‘मिर्झिया’ पोस्टर.गुलजार यांनी लिहलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा याने केले आहे. हा चित्रपट ७ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.