Join us

'मिर्झापूर' फेम ही अभिनेत्री म्हणतेय, इंटिमेट सीन करणं फाइट सीन इतकंच आहे चॅलेंजिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 15:40 IST

बोल्ड सीनसाठी अभिनेत्रीना ट्रोल केले जाते

 

बॉलिवूडमधील अभिनेत्री किंवा ओटीटी व मालिकेतल्या अभिनेत्री कोणत्याही प्लॅटफॉर्म असो, हिरोइन्सला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी ट्रोल केले जाते. सर्वात जास्त बोल्ड सीन केल्यामुळे अभिनेत्रींवर टीका केली जाते. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. याच मुद्द्यावर आता मिर्झापूर फेम अभिनेत्री अनंगशा बिस्वास हिने आपलं मत व्यक्त केले आहे.

बोल्ड सीनसाठी अभिनेत्रीना ट्रोल केले जाते, या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. ती म्हणाली की, बोल्ड सीनसाठी फक्त स्त्रियांनाच का ट्रोल केले जाते? पुरूष अभिनेत्यांना अभिनेत्रींसारखा अपमान का सहन करावा लागत नाही?

अनंगशाने यावर आपले मत स्पष्ट केले. तिने सांगितले की, आपल्या समाजात लिंग भेदभावाकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे आणि प्रगतीशील दृष्टीकोन ठेवला पाहिजे. प्रेक्षकांना हे समजणे आवश्यक आहे की इंटिमेट सीन करणे हे फाईट सीन करण्या एवढेच कठीण आहे.

अनंगशा पुढे म्हणाली कि, मी ट्रोलिंग कडे लक्ष देत नाही परंतु लैंगिक पक्षपात हे असे काहीतरी आहे ज्यात तिला सकारात्मक बदल घडवायचा आहे.        अनंशगाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच मिर्झापूर २मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनंगशने हिंदी चित्रपट लव शव ते चिकन खुराणा आणि बेंनी बाबूमध्ये काम केले आहे.

 

 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज