Join us

मिरर मिरर या नाटकाद्वारे मिनिषा लांबा करणार रंगभूमीवर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 18:13 IST

मिरर मिरर या नाटकाद्वारे बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अतिशय कल्पक, उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेले मिरर मिरर हे नाटक मुंबईकरांसाठी एनपीसीएमध्ये १ ऑक्टोबरपासून दाखल होत आहे.

एजीपी वर्ल्ड या भारतातील सर्वात मोठ्या नाट्यनिर्मिती कंपनीने सैफ हैदर हसन दिग्दर्शित मिरर मिरर हे नाटक मुंबईत आणले आहे. या नाटकाद्वारे बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अतिशय कल्पक, उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेले मिरर मिरर हे नाटक मुंबईकरांसाठी एनपीसीएमध्ये १ ऑक्टोबरपासून दाखल होत आहे.

मिरर मिरर ही गोष्ट आहे भावंडांमधील चढाओढीची. या नाटकामध्ये मिनल आणि मान्या या अगदी सारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींचे नातेसंबंध दर्शवण्यात आले आहेत. विशिष्ट परिस्थितीमुळे एखाद्या स्त्रीचे नशीब पूर्णपणे बदलून जाते अशी या नाटकाची कहाणी आहे. या नाटकाविषयी दिग्दर्शक सैफ हैदर हसन सांगतात, मिरर मिरर ही एक मानसशास्त्रीय रोलर कोस्टर राइड आहे. ती प्रेक्षकांना त्यांच्या सीटवरून हलू देणार नाहीये. हे नाट्य म्हणजे कलाकारासाठी उत्तम एक्सरसाइज आहे, एका वेळेस पडद्यावर १३ वेगवेगळी पात्रं साकारणे ही सोपी गोष्ट नाहीये.

मिनिषा लांबा पहिल्यांदाच नाटकात काम करत आहे, याविषयी एजीपी वर्ल्डचे निर्माते आणि एमडी अश्विन गिडवानी सांगतात की, मिनिषा लांबाचा अभिनय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल अशी आम्हाला खात्री आहे. खुर्चीवर खिळवून ठेवणारे हे नाटक तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच गुंतवून ठेवेल.’’

मिरर मिरर ही हे ७५ मिनिटांचा एकपात्री अभिनय असलेले नाट्य मिनल आणि मान्या या बहिणींच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकते आणि ही भूमिका मिनिषा लांबाने साकारली आहे. या नाटकात तिने विविध पात्रं साकारली आहेत. मिनलचे लहानपण अतिशय मजेत चालले आहे. मात्र, आजवर काकांकडे असलेली तिची बहीण मान्या घरी येते आणि सगळं बदलून जातं... मिनलमध्ये कटुतेची बीजे रोवली जातात. मोठी होत असताना तिला सतत मान्याच्या सावलीखाली दबल्यासारखं वाटतं. मान्याला आपल्यापेक्षा जास्त प्रेम केल्याबद्दल, महत्त्व दिल्याबद्दल ती तिचे पालक, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी सर्वांनाच दोष देते. एक वेगळीच मिनिषा लांबा या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

टॅग्स :मिनिषा लांबा