Join us
Daily Top 2Weekly Top 5

मम्मी लारा दत्ताच्या नव्हे तर पापाच्या पावलावर पाऊल टाकताना दिसली चिमुकली सायरा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

अभिनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांची मुलगी सायरा सध्या अभिनयाचे नव्हे तर टेनिसचे धडे घेताना बघावयास मिळत आहे. सायरा नुकतीच मुंबईच्या टेनिस कोर्टवर पापा महेश भूपतीसोबत प्रॅक्टिस करताना बघावयास मिळाली. याबाबतचे तिचे काही फोटोज् समोर आले आहेत.

अभिनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांची मुलगी सायरा सध्या अभिनयाचे नव्हे तर टेनिसचे धडे घेताना बघावयास मिळत आहे. सायरा नुकतीच मुंबईच्या टेनिस कोर्टवर पापा महेश भूपतीसोबत प्रॅक्टिस करताना बघावयास मिळाली. याबाबतचे तिचे काही फोटोज् समोर आले आहेत. मिस युनिव्हर्सचा ताज मिळविलेल्या लाराची सहा वर्षांची चिमुकली सायरा पापासोबत टेनिस खेळताना दिसत आहे. तिला अभिनेत्री नव्हे तर टेनिस स्टार बनायचे आहे.यावेळी सायरा प्रॅक्टिस करताना प्रॉपर ड्रेसमध्ये बघावयास मिळाली.पापा महेश स्वत: आपल्या लेकीची प्रॅक्टिस घेताना बघावयास मिळत आहेत.यावेळी सायराने मिनी माऊसचा व्हाइट टी-शर्ट, लेगिंग आणि पिंक कलरची कॅप घातलेली आहे.