Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमणने शेअर केला प्रेयसीसोबतचा न्यूड फोटो, सोशल मीडियावर रंगलीय या फोटोचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 10:27 IST

मिलिंद सोमण आणि त्याच्या प्रेयसीच्या याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देनवव्दीच्या दशकात मिलिंद आणि त्याची प्रेयसी मधू सप्रे यांनी एका शूजच्या जाहिरातीसाठी मॉडलिंग केले होते. या जाहिरातीसाठी मिलिंद आणि मधूने चक्क न्यूड फोटोशूट केले होते.

सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच फिट आहे. तरुणांना लाजवेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस आहे.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. मिलिंद अनेकवेळा त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्याच्या चाहत्यांना हे वर्कआऊट करण्यासाठी चॅलेंज देत असतो. तसेच तो त्याचे जुने फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा नव्वदीच्या दशकातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि आता तर चक्क त्याने त्याचा एक वादग्रस्त फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

नवव्दीच्या दशकात मिलिंद आणि त्याची प्रेयसी मधू सप्रे यांनी एका शूजच्या जाहिरातीसाठी मॉडलिंग केले होते. या जाहिरातीसाठी मिलिंद आणि मधूने चक्क न्यूड फोटोशूट केले होते. या वादग्रस्त जाहिरातीची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती. हाच मधूसोबतचा न्यूड फोटो मिलिंदने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला असून त्यासोबत लिहिले आहे की, हा फोटो माझ्या टाइमलाइमच्या पॉपअपमध्ये मला सतत पाहायला मिळतो. या फोटोला आता २५ वर्षं झाले आहेत. त्यावेळी इंटरनेट, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टी नव्हत्या. हा फोटो आज प्रदर्शित झाला असता तर लोकांची काय प्रतिक्रिया असती याचा मी नेहमीच विचार करतो. 

मिलिंद सोमणच्या याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण मिलिंदच्या या फोटोला काहीच तासांत ६९ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे तर सामान्य लोकच नव्हे तर व्हीजे अनुष्का, फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी देखील या फोटोवर कमेंट केले आहे.

टॅग्स :मिलिंद सोमण