Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाचा मिलिंद सोमण का म्हणतोय, ‘तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका...;

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:57 IST

‘तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका...; हे कॅप्शन देत मिलिंदने एक इंटरेस्टिंग व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देमिलिंदने या व्हिडिओसोबत एक मजेदार कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मी व्यायामाचा एक नवा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा व्यायाम करून पाहाणार असाल तर स्वतःची काळजी घ्या.. तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका...

सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच फिट आहे. तरुणांना लाजवेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस आहे.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. मिलिंद अनेकवेळा त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्याच्या चाहत्यांना हे वर्कआऊट करण्यासाठी चॅलेंज देत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओत तो एका अतरंगी अंदाजात पुश अप्स करताना दिसत आहे. पूश अप्स करताना त्याने त्याचे शरीर हवेत झोकून दिले असून त्यानंतर दोन्ही हात, पाय तो जमिनीवर पुन्हा टेकवताना दिसत आहे. 

मिलिंदने या व्हिडिओसोबत एक मजेदार कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मी व्यायामाचा एक नवा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा व्यायाम करून पाहाणार असाल तर स्वतःची काळजी घ्या.. तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका...

मिलिंद सोमण नुकताच फोर मोअर शॉर्ट प्लीझ या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाला. यात त्याने इंटिमेट सीन दिले आहेत. यामुळे तो चर्चेतदेखील आला होता. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमणने सांगितले होते की, 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमधील माझे इंटिमेट सीन पाहून माझी पत्नी अंकिता एकदम कुल होती. पहिल्या सिझनच्यावेळीच स्क्रिप्ट वाचताना मला इंटिमेट सीन करायचे असल्याचे माझ्या लक्षात आले होते. तसेच एका सीनमध्ये मला टेबलावर अंडरवेअरमध्ये चालायचे होते. हे ऐकून अंकिता म्हणाली होती की, हे सारे खूपच मजेशीर असणार... माझ्यापेक्षा तीच यासाठी अधिक उत्साही होती.' 

टॅग्स :मिलिंद सोमण