Milind Soman On Trolling: बॉलिवूडसेलिब्रिटींपैकी काही सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता मिलिंद सोमन .वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्याचा फिटनेस तरुणांना लाजवणारा आहे. मिलिंदला 'आयर्नमॅन' म्हणूनदेखील ओळखलं जातं. मिलिंदने अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मिलिंद सोमण प्रचंड चर्चेत राहिला आहे. २२ एप्रिल २०१८ साली त्याने मैत्रीण अंकिता कंवरशी केलेल्या लग्नामुळे तो पुन्हा चर्चेत आला. त्या दोघांच्या वयामध्ये २६ वर्षांचं अंतर आहे. हे लग्न अलिबाग येथे झाले होते.हे मिलिंदचं दुसरं लग्न आहे.
५२ व्या वर्षी एका २६ वर्षीय तरुणीशी विवाह केल्यामुळे मिलिंद सोमणला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता, अनेक वर्षांनंतर, वयातील अंतरावरून झालेल्या या ट्रोलिंगबद्दल मिलिंदने मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. झुम सोबत संवाद साधताना मिलिंद सोमण म्हणाला," मला त्याचा काही त्रास झाला नाही. पण, अंकिताला याचा नक्कीच त्रास झाला असेल. कारण तिला यातलं फारसं काही माहित नव्हतं. त्यानंतर मी त्याला समजावून सांगितलं, ट्रोलर्स तुला किंवा मला ओळखत नाहीत, त्यामुळे ते जे काही म्हणतात ते त्यांचं मत असते आणि हे तिला खूप लवकर समजलं. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तिला जातं."
त्यानंतर मग अभिनेता पुढे म्हणाला, "सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर तिने ट्रोलिंगचा जास्त विचार केला नाही आणि मला वाटतं की याचं कारण आमच्या नात्यातील घट्टपणा देखील आहे.आज आमचं नातं अनेकांनी स्विकारलं आहे. अर्थात, आम्हाला कोणाच्या सहमतीची गरज नाही. परंतु, यामुळे छान वाटतं. 'आमचं नातं १३ वर्षे टिकलं याचा लोकांना कौतुक वाटतं."
दरम्यान, अंकिता एअर होस्टेस आहे आणि चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये तिची मिलिंदशी भेट झाली.या भेटीचं रुपांतर मित्र आणि नंतर या नात्याचे प्रेमात रूपांतर झालं.
Web Summary : Milind Soman faced trolling for marrying Ankita Konwar, who is 26 years younger. He revealed that he wasn't bothered by it, but Ankita was initially affected. He clarified to her that the trolls don't know them, and she understood, strengthening their bond.
Web Summary : मिलिंद सोमन को 26 साल छोटी अंकिता कोंवर से शादी करने पर ट्रोल किया गया। उन्होंने बताया कि उन्हें इससे कोई फर्क नहीं पड़ा, लेकिन अंकिता शुरू में प्रभावित हुईं। उन्होंने उसे स्पष्ट किया कि ट्रोल उन्हें नहीं जानते हैं, और वह समझ गई, जिससे उनका बंधन मजबूत हुआ।