मिलिंद सोमण करणार स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेन्डशी लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 12:18 IST
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर कदाचित बॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकू शकतो. हा सेलिब्रिटी कोण तर ...
मिलिंद सोमण करणार स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेन्डशी लग्न?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर कदाचित बॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकू शकतो. हा सेलिब्रिटी कोण तर अभिनेता मिलिंद सोमण . होय, सुपरमॉडर, अभिनेता आणि रनर मिलिंद गेल्या काही महिन्यांपासून अंकिता कोनवार नामक तरूणीला डेट करतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर ही लव्हस्टोरी गाजते आहे. कारण मिलिंद सोमण ५१ वर्षांचा आहे तर अंकिता केवळ १८ वर्षांची असल्याचे म्हटले जात आहे. वयाच्या या अंतरावरून मिलिंद सोशल मीडियावर ट्रोलही झाला आहे. पण टीकेची पर्वा करेल तो मिलिंद कुठला. आता तर मिलिंदने या रिलेशनशिपला अधिकृत नाव देण्याचा निर्णय घेतल्याचेही कळतेय. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद अलीकडे अंकिताच्या घरी गेला होता. इथे दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाबद्दल चर्चा केली. अंकिता गुवाहाटीची राहणारी आहे. २०१३ मध्ये ती एअर एशियाच्या केबिन क्रूचा भाग होती. या अर्थाने मिलिंदची ही गर्लफ्रेन्ड १८ वर्षांची नसून कदाचित २३-२४ वर्षांची असावी. कारण एअरलाईन्समध्ये जॉब करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली हवीत.अंकिता तूर्तास दिल्लीत राहते. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी याशिवाय फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा येतात. मुव्हीज पाहणे आणि स्वीमिंग तिचे छंद आहेत. तिला भटकायलाही जाम आवडते. कदाचित त्याचमुळे वयात ३० वर्षांचा फरक असूनही मिलिंद व तिची केमिस्ट्री इतकी जबरदस्त आहे. ALSO READ : see photos : मिलिंद सोमणही पडला अर्ध्या वयाच्या तरूणीच्या प्रेमात!!अंकिताने २०१५ मध्ये मिलिंदसोबत १० हजार किमीची मॅराथॉन पूर्ण केली होती. मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो.२००६ मध्ये मिलिंद सोमणने फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ हिच्यासोबत लग्न केले होते. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही. मिलिंद ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. सध्या मिलिंद फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ रोजी मिलिंदने आयर्न मॅन कॉन्टेस्ट जिंकले होते. ३.८ किमी स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करत त्याने हा किताब आपल्या नावावर केला होता.