Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांविना धावल्याने मिलिंद सोमण ट्रोल, लोक म्हणाले - ई उमर में हार्मोनवा पर कंट्रोल नहीं रहता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:54 IST

मिलिंद सोमणने नेकेड फिट बॉडीचा फोटो त्याच्या वाढदिवसाला पोस्ट केला. जसेही लोकांचे लक्ष या फोटोवर गेले लोकांनी गंमत करण्याची  जराही संधी सोडली नाही.

सुपरमॉडल ते अभिनेता असा प्रवास करणारा मिलिंद सोमण आज त्याचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात त्याने वाढदिवसाला एक असा फोटो शेअर केलाय ज्यावरून यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत. फिटनेस फ्रीक मिलिंदने गोव्यातील बीचवरील एक फोटो शेअर केलाय. यात तो कोणत्याही कपड्याविना दिसत आहे. हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुंवरने क्लिक केलाय. यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

मिलिंद सोमणने नेकेड फिट बॉडीचा फोटो त्याच्या वाढदिवसाला पोस्ट केला. जसेही लोकांचे लक्ष या फोटोवर गेले लोकांनी गंमत करण्याची  जराही संधी सोडली नाही. अनेक लोकांनी त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून अंडरगारमेंट्सचे फोटो कमेंट केले आहेत. त्याच्या या पोस्टवरून अनेक मजेदार मीम्सही व्हायरल झाले आहेत. (मिलिंद सोमणच्या याच वादग्रस्त फोटोने झाला होता प्रचंड गदारोळ, आजही चाहत्यांच्या लक्षात)

टॅग्स :मिलिंद सोमण बॉलिवूड