मिलिंद सोमण बनला 'अल्ट्रामॅन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 18:16 IST
प्रेक्षकांचा लाडका कलाकार मिलिंद सोमण याने सातासमुद्रापलिकडे तिरंगा फडकविला आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या सोमणने ३ दिवसात ५१७ कि.मी. ...
मिलिंद सोमण बनला 'अल्ट्रामॅन'
प्रेक्षकांचा लाडका कलाकार मिलिंद सोमण याने सातासमुद्रापलिकडे तिरंगा फडकविला आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या सोमणने ३ दिवसात ५१७ कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे. ही स्पर्धा फ्लोरेडा शहरात पार पडली आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. अल्ट्रामॅन ही जगातील सर्वात कठीण अशी मॅरेथॉन आहे. या स्पर्धेमध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात. ज्यामध्ये पहिल्या दिवशी १० कि.मी. पोहणे आणि १४२ कि.मी. सायकलिंग करणे, दुसºया दिवशी २७६ कि.मी. सायकलिंग तर तिसºया दिवशी ८४ कि.मी. धावावे लागते. मिलिंद सोमणच्या व्यतिरिक्त ४ भारतीयदेखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनीदेखील स्पर्धा पूर्ण केली आहे. अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा अशी या भारतीयांची नावे आहेत. विशेष म्हणजे मिलिंदने ही मॅरेथॉन अनवाणी पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मिलिंदने, मी आनंदी असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे त्याने म्हटले. प्रेमळ जगाने अल्ट्रामॅन मिलिंदला हॅलो म्हणावे, अशा शब्दात त्याने आपल्या भावना फेसबुकवरुन व्यक्त केले असल्याचे पाहायला मिळते. दिसते. या भावनिक पोस्टसोबतच मिलिंदने आईसोबत आणि भारतीय राष्ट्रध्वज हातामध्ये घेऊन काही फोटो शेअर केले आहेत. मिलिंद सोमण हा नुकताच बाजीराव मस्तानी या चित्रपटात झळकला होता. त्याचबरोबर अ माऊथ फुल आॅफ स्काय या मालिकेच्या माध्यमातून छोटया पडदयावरदेखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे त्याच्या या खेळाडूवृत्तीप्रमाणेच त्याने अभिनयानेदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे.