Join us

Mili First Look : जान्हवी कपूरचा 'मिली'मधला फर्स्ट लूक आउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:39 IST

Mili Movie : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आगामी 'मिली' चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor)ने २०१८ मध्ये 'धडक' (Dhadak) चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर तिने मोजकेच सिनेमे केले पण इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. तिचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. जान्हवी कपूरच्या यापैकी एक असलेल्या 'मिली' (Mili) चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. 'मिली' चित्रपटातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तिने एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती पाठीवर बॅग घेऊन कॅमेराकडे पाहत हसत आहे. जान्हवी कपूरच्या पोस्टरवर लिहिले आहे, 'नाव मिली नौडियाल, वय 24 वर्षे, पात्रता बीएससी नर्सिंग ग्रॅज्युएट.' यासोबत तिने 'तिचे आयुष्य एका तासात बदलणार आहे... मिली' असे कॅप्शन लिहिले आहे. 

जान्हवी कपूरचा 'मिली' चित्रपट मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तर मनोज पाहवा तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.  'मिली' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शनही मथुकुट्टी झेवियर यांनी केले होते. 'मिली' चित्रपटाची घोषणा २०२१ साली करण्यात आली होती. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन कंपनीद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जान्हवी कपूर शेवटची 'गुडलक जेरी' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मिली व्यतिरिक्त जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटात 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल'चा समावेश आहे.
टॅग्स :जान्हवी कपूर