Join us

बंदी उठताच मीका सिंग म्हणाला, ‘मेरी मर्जी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 10:35 IST

अखेर क्षमायाचनेनंतर सिंगर मीका सिंगवरील बंदी हटवण्यात आली. मी सर्वांची माफी मागतो, असे मीका यावेळी म्हणाला. पण याचवेळी नेहा कक्कर आणि सोनू निगम यांना लक्ष्य करण्याची संधीही त्याने साधली.

ठळक मुद्दे पाकिस्तानी कॉन्सर्टमध्ये मिळालेले पैसै दान देणार की त्यावर कर भरणार? असे एका पत्रकाराने विचारले असती मीका चांगलाच भडकला.

अखेर क्षमायाचनेनंतर सिंगर मीका सिंगवरील बंदी हटवण्यात आली. बुधवारी एका पत्रपरिषदेत मीकाने पाकिस्तानात परफॉर्म केल्याबद्दल देशाची माफी मागितली. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईने मीकावरची बंदी मागे घेतली. मी सर्वांची माफी मागतो, असे मीका यावेळी म्हणाला. पण याचवेळी नेहा कक्कर आणि सोनू निगम यांना लक्ष्य करण्याची संधीही त्याने साधली.जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय कलाकारांवरही बंदी घातली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मीका सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मीका सिंह कराची येथे परफॉर्मन्स देताना दिसून आला होता.  जनरल मुशर्रफच्या नातेवाईकाच्या एका विशेष कार्यक्रमात मीकाने परफॉर्मन्स केला होता. या घटनेचे पडसाद भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये उमटले होते. यानंतर भारतात त्याच्यावर काम करण्यास बंदी लादली गेली होती.मीडियाशी बोलताना मीका म्हणाला की, मी सर्वांची माफी मागतो. यापुढे असे होणार नाही. व्हिसा मिळाला तर कुणीही पाकिस्तानात जाणार. तुम्हाला मिळाला तर तुम्हीही जाणार. मला मिळाला आणि मी गेला. मी खूप आधी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते. पण मी तिकडे परफॉर्म करत होतो आणि इकडे भारत सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. हा केवळ एक योगायोग होता.

 नेहा, सोनूला केले लक्ष्यनेहा कक्कर आणि सोनू निगम अशा अनेक कलाकारांनी पाकिस्तानी गायक आतिम असलमसोबत पाकिस्तानात कार्यक्रम केले आहेत. पण त्यांच्याविरोधात कुणी काहीच बोलले नाही. माझ्या नावावर पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न होतोय, असे मीका तावातावात म्हणाला. पाकिस्तानी कॉन्सर्टमध्ये मिळालेले पैसै दान देणार की त्यावर कर भरणार? असे एका पत्रकाराने विचारले असती मीका चांगलाच भडकला आणि पत्रकार परिषद सोडून निघून गेला. जाता जाता मी कुठेही शो करेल, माझी मर्जी, असे तो म्हणाला.

टॅग्स :मिका सिंग