Join us

#MeToo : कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर अभिनेत्री कृतिका शर्माचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 20:51 IST

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृतिकाने सुमारे पाच वर्षांपूर्वीची एक घटना शेअर  केली.

मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्माने कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृतिकाने सुमारे पाच वर्षांपूर्वीची एक घटना शेअर  केली. २०१३ मध्ये एका आॅडिशनदरम्यान कृतिका विक्कीला भेटली होती.‘आॅडिशनसाठी माझी निवड झाल्यावर मला बोलवण्यात आले़ सगळे काही अचानक झाल्याने मला माझे तिकिट बुक करण्यास व राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले गेले. मी तिकिट बुक केले. पण राहण्यासाठी मला विक्की सिदानाच्या कार्यालयाची मदत घ्यावी लागली. मुंबईला पोहोचल्यावर मी विक्कीच्या कार्यालयात गेले. पण मदत करण्याऐवजी  विक्कीने मला पाहताच प्रश्न केला. मी तुझी मदत केली तर तू मला काय देशील, असा त्याचा प्रश्न होता. यानंतर एका मीटींगच्या बहाण्याने तो मला   एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेला आणि एका फ्लॅटमध्ये पोहोचताच दरवाजा बंद करून मला त्याने अचानक धक्का देत बेडवर पाडले आणि माझ्यासोबत बळजबरी करू लागला, मी त्याला विनंत्या केला. मी तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आले, असे काय काय मी त्याला ओरडून ओरडून सांगितले. शेवटच्या क्षणाला त्याला काय वाटेल माहित नाही, पण तो थांबला आणि आॅटो कर अन् निघ, तुझी फ्लाईट आहे, असे तो मला म्हणाला. यानंतर मी तडक आॅटो पकडून एअरपोर्टकडे निघाले,’ असे कृतिकाने सांगितले़ ही आपबीती सांगताना अनेकदा ती भावूक झाली.    दरम्यान विक्की सिदानाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मी यावर लवकरच खुलासा करते़ तोपर्यंत प्रतीक्षा करा, असे त्याने म्हटले आहे.

टॅग्स :मीटू