Join us

#Metooची आग टॉलिवूडपर्यंत! गायिका चिन्मयी श्रीपदाच्या आरोपांमुळे खवळले कवी, गीतकार वैरामुत्तु!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 20:46 IST

साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे.

मीटू’ची आग आता बॉलिवूडमधून टॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. होय, साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे.

‘१९ वर्षांची असताना मी माझ्या आईसोबत एका अतिशय दिग्गज व्यक्तिला भेटायला गेले होते. माझी आई माझ्यासोबत होती. पण प्रत्यक्षात मला एकटीलाचं आत बोलवण्यात आले. मला फार आश्चर्य वाटले नाही. मी बेधडकपणे एकटीच खोलीत गेले. पण गेल्या गेल्या त्या व्यक्तिने मला अलिंगण दिले. मी त्याच्या तावडीतून निसटून बाहेर पडायला लागले असता त्याने माझा फोन आणि बॅग पकडून घेतली. या घटनेनंतर अनेक दिवस मी अस्वस्थ होते. ही व्यक्ती दुसरी कुणी नाून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तामिळ कवी, गीतकार व लेखक वैरामुत्तु आहेत,’असे चिन्मयी श्रीपदाने ट्विटरवर लिहिले आहे.

चिन्मयीने ‘चैन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील ‘तितली’ हे लोकप्रीय गाणे गायले आहे. २०१४ मध्ये तिने साऊथ अभिनेता राहुल रवींद्रमसोबत लग्न केले.

दरम्यान चिन्मयीचे हे आरोप वैरामुत्तु यांनी धुडकावून लावले आहेत. असे काही असेल तर तिने माझ्याविरोधात केस करावी. मी तिचे आव्हान स्वीकारले आहे. मी पुरावे गोळा करतोय, जेणेकरून तिचे सगळे आरोप खोटे ठरवू शकेल. मी वाईट आहे की चांगला, कृपया सध्या मला जज करू नका, असे वैरामुत्तु यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

टॅग्स :मीटू