Join us

#MeToo : ‘मी टू’अंतर्गत व्हायरल होतोय, सलमान खानचा हा जुना व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:50 IST

 सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमान खान ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एक धक्कादायक विधान करतो आहे.

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ चळवळ जोरात आहे. या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांवर गंभीर आरोप केले आहेत. विकास बहल, रजत कपूर, कैलाश खेर यांच्यावर अनेकींनी गैरवर्तनाचे आरोप ठेवले आहेत. आलोक नाथ यांच्यावरही बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘मी टू’अंतर्गत अनेक जुने व्हिडिओही व्हायरल होत आहे. सलमान खानचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमान खान ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एक धक्कादायक विधान करतो आहे.

तुम्हाला ठाऊक आहेच की, सलमान व ऐश्वर्याच्या लव्हस्टोरीपेक्षा त्यांचे ब्रेकअप गाजले होते. या पार्श्वभूमीवरचा हा व्हिडिओ आहे. यात एक महिला पत्रकार सलमानला प्रश्न विचारतेय आणि सलमान त्यावर उत्तर देतोय. तू कधी कुठल्या महिलेवर हात उचललास का? असा प्रश्न महिला पत्रकार सलमानला करते. यावर, ‘आता महिलेने (ऐश्वर्या राय) तसे म्हटले असेल तर मी त्यात पडू इच्छित नाही. तुम्ही कुणाला मारत असाल तर साहजिक त्याक्षणी तुम्ही रागात असाल, तुमचे भांडण सुरू असणार. रागात व्यक्ति जोरात मारतो. मी कुण्या महिलेवर हात उचलला तर ती जिवंत तरी राहील का? हे सगळे खोटे आहे,’असे उत्तर सलमानने दिले आहे.‘मी टू’चळवळीअंतर्गत व्हायरल होत असलेला हा जुना व्हिडिओ पाहून अनेकजण सलमानवर टीका करत आहेत. ऐश्वर्या आणि सलमान यांनी 'हम दिल दे चुके सनम'  या सिनेमात एकत्र काम केले होते. याच सिनेमाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र 'हम तुम्हारे हैं सनम'  या सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. या सिनेमात ऐश्वर्या सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय होते? हे   फार कमी जणांना ठाऊक आहे. मात्र कथितरित्या ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता.  

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनमीटू