#MeToo : लैंगिक शोषणावर आता विद्या बालनही बोलली, वाचा तिने काय म्हटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 18:23 IST
सध्या जगभरातील महिला लैंगिक शोषणावर बोलत आहेत. त्यास सेलिब्रिटीही त्यांच्यासोबत झालेल्या या कटू प्रसंगांच्या आठवणी जाहीरपणे सांगत असल्याने सर्वसामान्य ...
#MeToo : लैंगिक शोषणावर आता विद्या बालनही बोलली, वाचा तिने काय म्हटले!
सध्या जगभरातील महिला लैंगिक शोषणावर बोलत आहेत. त्यास सेलिब्रिटीही त्यांच्यासोबत झालेल्या या कटू प्रसंगांच्या आठवणी जाहीरपणे सांगत असल्याने सर्वसामान्य महिलादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठविताना दिसत आहेत. हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमधील बºयाचशा सेलिब्रिटींनी यावर अतिशय बिनधास्तपणे भाष्य केले आहे. आता अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील लैंगिक शोषणावर आपले मत व्यक्त केले. विद्याच्या मते, असे कृत्य करणाºया लोकांचे नाव समोर यायला हवे. तसेच त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणायला हवा. विद्याने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, महिलांनी या विषयावर संकुचितपणा न दाखविता बिनधास्तपणे बोलायला हवे, कारण ती त्यांची चूक नाही. सध्या जगभरातील महिला #MeToo या कॅम्पेनअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवित आहेत. आयएएनएस या न्यूज एजन्सीच्या मते, विद्या बालनने म्हटले की, ‘मला खरोखरच आनंद होत आहे की, लोक निदान या विषयावर बोलत आहेत. महिला बिनधास्तपणे अशाप्रकारचे प्रसंग सांगत आहेत. त्यामुळे इतरांनीदेखील न घाबरता असे कृत्य करणाºयांचा चेहरा उघड केला पाहिजे. आतापर्यंत कॉमेडियन मल्लिका दुवा, टीव्ही अभिनेत्री मूनमून दत्ता यांनी #MeToo या कॅम्पेनअंतर्गत त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडपणे सांगितल्या. याव्यतिरिक्त ऋचा चढ्ढा, कल्की कोचलिन, फरहान अख्तर यांसारख्या अभिनेत्यांनी त्यास समर्थनही दिले. विद्या बालन लवकरच ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये ती तिची को-स्टार नेहा धूपिया आणि आर. जे मलिष्का हिच्यासोबत पोहोचली होती. ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘हवा हवाई’ रिक्रिएट करून दाखविण्यात आले आहे. या गाण्यात विद्या साडी घालून डिस्को करताना बघावयास मिळत आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.