Join us

‘मिर्झियां’चे दुसरे ट्रेलर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 17:11 IST

हर्षवर्धनचा हा पहिलाच चित्रपट असून, त्याच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेर आहे

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झियां‘ या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर युट्यबवर दाखल झाले आहे. पहिल्याच दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युव्ज त्याला मिळाले. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. हर्षवर्धनचा हा पहिलाच चित्रपट असून, त्याच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेर आहे. गाण्याने सुरू होणाºया या ट्रेलरमध्ये कथेचा बराच उलगडा होतो.  राजस्थान, लडाख व बाडमेर येथे चित्रपटाची शूटींग करण्यात झाली असून पाकिस्तानपासून केवळ १७ किलोमीटर दूर भागातही काही दृश्ये चित्रित करण्यात आले आहेत.