Join us

सौंदर्यकन्या वहिदा रहमान यांच्या आयुष्यात आलेले पुरूष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 15:23 IST

आपल्या सौंदर्याने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारी ‘रोजी’ अर्थात वहिदा रहमान यांची बॉलिवूड एंट्री खूप मजेदार ठरली. सी. आय. डी., प्यासा, ...

आपल्या सौंदर्याने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारी ‘रोजी’ अर्थात वहिदा रहमान यांची बॉलिवूड एंट्री खूप मजेदार ठरली. सी. आय. डी., प्यासा, कागज के फुल, चौदहवी का चाँद, साहिब बिवी और गुलाम, गाईड, नीलकमल अशा चित्रपटांमध्ये काम केलेल्या वहिदा यांचे गुरूदत्तसोबतचे प्रेम प्रकरण त्या काळात खूप गाजले.  Also read ​असफल प्रेमाचा नायक ‘गुरूदत्त’वहिदा रहमान यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९५४ साली केली. जयसिंहा (१९५५), रोजुलू मरायी (१९५६) आणि तमिळ चित्रपट कालम मारी पोचू (१९५५) हे त्यांचे सुरूवातीचे चित्रपट. रोजुलू मारायीच्या सक्सेस पार्टीमध्ये गुरूदत्त यांनी वहिदांना पाहिले. वहिदांनी गुरूदत्त यांना ‘मेंटॉर’ म्हणून मानले. गुरूदत्त यांनी वहिदा रहमान यांना मुंबईत आणले आणि आपल्या प्रॉडक्शनमध्ये सी. आय. डी. (१९५६) चित्रपटाची निर्मिती केली. दत्त यांनी प्यासा (१९५७) या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत घेतले.  त्यानंतर कागज के फुल (१९५९) मध्ये वहिदा रहमान होत्या. या दोघांमध्ये आकर्षण वाढले होते. त्यावेळी गुरूदत्त यांचे गीता दत्त यांच्याशी लग्न झालेले होते. या दोघांचे प्रेम बहरत होते. चौदहवी का चाँद, साहिब बिवी और गुलाम या चित्रपटात त्यांनी काम केले. बर्लिन फिल्म फेस्टीव्हल दरम्यान १९६३ साली त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने ते वेगळे झाले. १० आॅक्टोबर १९६४ रोजी गोळ्या आणि दारूच्या अतिसेवनाने गुरूदत्त यांचा  मृत्यू झाला. त्यामुळे ही प्रेमकहाणी इथेच संपुष्टात आली.याबाबत वहिदा रहमान यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘मला माझ्या आयुष्य खासगी राहू द्या. मला असे वाटते की, कागज के फुलमुळे गुरूदत्त यांना डिप्रेशन आल्याचे मला वाटत नाही. चौदहवी का चाँदमुळे चांगला व्यवसाय केला होता.’१९६०, १९७० आणि १९८० च्या दशकात त्यांनी चित्रपटात काम केले. देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यासोबत त्यांनी चित्रपट केले. त्या काळात त्यांना ‘रोजी’ या टोपणनावाने ओळखले जायचे. वहिदा रहमान यांनी शशी रेखी (चित्रपटातील नाव कमलजीत) यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. शगून या चित्रपटादरम्यान त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्यांनी २७ एप्रिल १९७४ साली लग्न केले. त्यांना सोहेल आणि कश्वी ही मुले आहेत. लग्नानंतर त्या बंगळुरूकडे गेल्या. २००० साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्या पुन्हा मुंबईत आल्या. Also Read अभिनेत्री नाही तर वहिदा रहमान यांना बनायचे होते डॉक्टर!वहिदा रहमान या दिसायला सुंदर होत्या. त्यांच्यावर अनेक जण एकतर्फी प्रेम करीत होते. त्यातील एक म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान. इम्रान खान हा त्यांच्यावर प्रेम करायचा. अर्थात हे एकतर्फी प्रेम म्हणूनच ओळखले गेले. इम्रान खानने त्यांच्या सौंदर्याची तारीफ केली होती.