...त्या आठवणीने संजय दत्तला आजही रडू कोसळते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 13:58 IST
अभिनेता संजय दत्त हा सध्या आग्रा येथे त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतरचा त्याचा हा ...
...त्या आठवणीने संजय दत्तला आजही रडू कोसळते!
अभिनेता संजय दत्त हा सध्या आग्रा येथे त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतरचा त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे जेव्हा संजूबाबाला त्याच्या शिक्षा काळातील काही प्रसंग विचारण्यात आले तेव्हा त्याने त्यावेळी परिवाराची खूपच आठवण सतावत असल्याचे म्हटले. या कटू आठवणी सांगताना संजूबाबा खूपच भावनिक झाल्याचे बघावयास मिळाले. संजूबाबाने म्हटले की, शिक्षकाळात मला इंडस्ट्रीमधील लोकांची खूपच आठवण सतावत होती. मी या सर्व लोकांना माझा परिवार समजतो, त्यामुळे जेव्हा-जेव्हा या लोकांची मला आठवण येत असे, तेव्हा-तेव्हा मी अश्रुंना वाट मोकळी करून देत होतो. तब्बल ४० वर्षे मी इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. त्यामुळे बरेचसे असे लोक आहेत, ज्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा माझा परिवारच असल्याचे संजूबाबाने म्हटले आहे. तसेच त्याकाळात मी यासर्व लोकांना खूप मिस केल्याचेही त्याने सांगितले. ‘भूमी’च्या सेटवर पोहचल्यानंतर संजय दत्तचे इतर कलाकारांनी असे स्वागत केले होतेगेल्यावर्षी संजूबाबा पुणे येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडला होता. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या वेळी अवैद्य शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. तब्बल तीन वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला असून, उमंगकुमार यांच्या ‘भूमी’ या सिनेमातून तो पुन्हा रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असून, त्यात संजूबाबाची भूमिका अतिशय हळव्या स्वरूपाची असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा संजूबाबा ‘भूमी’च्या सेटवर पोहचला होता तेव्हा त्याचे जल्लोषात स्वागत केले होते. यामुळे संजूबाबा खूपच भारावून गेला होता. मात्र काहीही असो शिक्षाकाळातील काही आठवणी संजूबाबाला अजूनही सतावत आहेत, हे मात्र नक्की.