आलिया ‘हायवे’च्या आठवणींत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 08:24 IST
वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. हे आम्ही नाही तर आलिया भट म्हणतेय. तिच्या ‘हायवे’ सिनेमाला दोन वर्षे ...
आलिया ‘हायवे’च्या आठवणींत
वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. हे आम्ही नाही तर आलिया भट म्हणतेय. तिच्या ‘हायवे’ सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून तिने ट्विट करून चाहते आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीचे आभार मानले. तिने ट्विट केले की, तुमच्या प्रेमामुळे न कवेळ माझा दिवस तर माझे संपूर्ण आयुष्य आनंदी झाले आहे. हायवे चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली. त्याच्या आठवणी माझ्या स्मृतींमध्ये आजही ताज्या आहेत. हा चित्रपट करताना आलेला अनुभव आठवला की, मला आजही धडकी भरते. }}}} ‘हायवे’मध्ये तिच्यासह रणदीप हुडा सहकलाकार होता. ए. आर. रहमान यांच्या संगीताने सजलेला हा चित्रपट अपहरण झालेल्या मुलीच्या प्रेमकाहाणी बरोबरच उच्चभू्र समाजातील थोतांड आणि लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणारा होता.