Join us

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सोशल मीडियावर Memesचा पूर, पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:58 IST

Sidharth Malhotra and Kiara Advani’s wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी काल लग्नबंधनात अडकले. सध्या सोशल मीडियावर याच लग्नाची चर्चा आहे. सोबत मीम्सचाही पूर आला आहे.

 Sidharth Malhotra and Kiara Advani’s wedding : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर काल लग्नबंधनात अडकले. जैसलरमेर येथील सूर्यगढ पॅलेजमध्ये सिद्धार्थ व कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावरही कियारा व सिद्धार्थच्याच लग्नाची चर्चा आहे. दोघांचे लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सोबत एक ना अनेक भन्नाट मीम्सचाही पूर आला आहे. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सलमान तुझं कधी?

 सिद्धार्थ व कियाराचं सुद्धा आटोपलं, आता तुझं काय? असा सवाल करत अनेकांनी भाईजान सलमान खानची मजा घेतली आहे. या आधीही कतरिनाच्या लग्नावेळीही सलमानवर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

प्रीतीच्या लग्नात कबीर सिंगची अवस्था...

आमची तर RAC ची सीट कधीच कन्फर्म होत नाही...

 सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला लग्न केले. लग्नाच्या काही तासांनंतर, कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नाचे सुंदर फोटो शेअर केलेत. "आता आमची कायमची बुकिंग झाली आहे," असं कॅप्शन त्यांनी दिलं.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी