Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहुल चोकशीने बॅँकेसह हिमेश रेशमियालाही लावला चुना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 13:57 IST

पंजाब नॅशनल बॅँकेत हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाºया मेहुल चोकशीबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. गीतांजली जेम्सचे ...

पंजाब नॅशनल बॅँकेत हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाºया मेहुल चोकशीबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. गीतांजली जेम्सचे माजी अध्यक्ष आणि एमडी संतोष श्रीवास्तव यांनी मेहुलबद्दल हा खुलासा केला आहे. या खुलाशानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. संतोष श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुलने केवळ पीएनबीलाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही चुना लावण्याचे काम केले आहे. त्यामध्ये बॉलिवूडमधील आघाडीचा गायक हिमेश रेशमिया याच्या नावाचा समावेश आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संतोष श्रीवास्तव यांनी दावा केला की, मेहुल चोकशीने बºयाचदा बनावट आणि कमी किमतीचे हिरे ग्राहकांना विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींना कमी किमतीत विकले आहेत. संतोष यांच्या मते, अधिकच्या रकमेबद्दल मी नेहमीच मेहुल याला विचारणार केली, परंतु मेहुलने मला माझ्या कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. तसेच याबाबत जास्तीचे लुडबूड खपवून घेणार नसल्याचाही त्याने इशारा दिला होता.संतोष श्रीवास्तव यांच्या मते, हिमेश रेशमिया याच्यासोबत टीव्ही कमर्शियलच्या मोबदल्यात ५० लाखांचे हिरे देण्याबद्दल चर्चा झाली होती. हिमेशने जेव्हा या हिºयांबाबत बाजारात चौकशी केली तेव्हा त्याची किंमत कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने मेहुलसोबतचे सर्व करार रद्द करण्याचे ठरविले. वास्तविक हे हिमेशसोबतच घडले असे नाही, तर अनेक सेलिब्रिटींना मेहुलने चुना लावण्याचे काम केले आहे.