Join us
Daily Top 2Weekly Top 5

Chiranjeevi: नातीच्या आगमनाने आजोबा चिंरजीवींचा आनंद गगनात मावेना, पोस्ट शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:24 IST

रामचरण आणि उपासनाच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. रामचरणचे चाहते या चिमुकलीला 'मेगा प्रिन्सेस' असं संबोधत आहेत.

साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी आज २० जूनला आजोबा झालेत. सुपरस्टार राम चरणला मुलगी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर राम चरण आणि उपसाना आई-बाबा झालेत. नन्ही परीच्या आगमनाने आजोबा खूपच खुश झालेत. त्यांनी नातीसाठी एक खास पोस्ट शेअर तिचे स्वागत केली आहे.  

चिरंजीवीने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ''स्वागत आहे छोटी मेगा प्रिन्सेस! तुझ्या येण्याने लाखो लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुझ्या जन्मामुळे आई-बाबा आणि आजी-आजोबांना खूप आनंद झाला आहे. आम्हाला अभिमान वाटतो. यादरम्यान चिरंजीवी आणि राम चरणच्या  चाहत्यांनी अनेक ठिकाणी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. हैद्राबाद येथील अपोलो रुग्णालयात उपासनाने मुलीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वीच RRR स्टार रामचरणने बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

लग्नाच्या १० वर्षांनंतर पाळणा हललासाऊथ मेगास्टार रामचरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले. रामचरणला मुलगी झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली. चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्हायरल केली. अपोलो रुग्णालायाचं मेडिकल बुलेटिन व्हायरल होत आहे. मुलगी आणि आई दोघीही स्वस्थ असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

रामचरण आणि उपासनाच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाच दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तर आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आला आहे कारण ते एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले आहे. रामचरणचे चाहते या चिमुकलीला 'मेगा प्रिन्सेस' असं संबोधत आहेत. १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली.

 

टॅग्स :चिरंजीवीराम चरण तेजा