Join us
Daily Top 2Weekly Top 5

भेटा; ‘यार दा दीवाना’तील रोमॅन्टिक हिरोला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:46 IST

‘शानदार’मधील ‘हॉट माचो दुल्हा’ बनलेला विकास वर्मा आठवतोय. होय, विकास पुन्हा परतलाय... ‘यार दा दीवाना’ या पंजाबी सिंगलमध्ये विकासने रोमॅन्टिक हिरो साकारला आहे.

‘शानदार’मधील ‘हॉट माचो दुल्हा’ बनलेला विकास वर्मा आठवतोय. होय, विकास पुन्हा परतलाय... ‘यार दा दीवाना’ या पंजाबी सिंगलमध्ये विकासने रोमॅन्टिक हिरो साकारला आहे. सराह(श्वेता शर्मा) हिच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरूणाच्या भूमिकेत विकास यात दिसतोयं.  सराहच्या कुटुंबाचा सराहच्या प्रेमाला विरोध असतो. मग काय,हा प्रेमवेडा आशिक त्याचे प्रेम मिळवण्यासाठी सगळ्यांशी लढतो, अशी ही थीम आहे. यापूर्वीच्या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर विकास टी-सिरिजच्या या नव्या सिंगलमध्ये एका रोमॅन्टिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच विकास यानिमित्ताने प्रचंड उत्साहात आहे. मला रोमॅन्टिक भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळेच मला या सिंगलबद्दल विचारणा झाली, तेव्हा मी क्षणात होणार दिला, असे विकास म्हणाला. ज्योती व सुल्ताना नूरान यांच्या आवाजातील या गाण्याला अनेकांची पसंती मिळाली आहे, तुम्हीही बघा...