राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भेटून कमल हासन हरवला जुन्या स्मृतीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 16:56 IST
मेगास्टार अमिताभ बच्चन यांना अलीकडे बॅकिंगहम पॅलेसमध्ये होणाºया भारत-इंग्लड सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ...
राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भेटून कमल हासन हरवला जुन्या स्मृतीत...
मेगास्टार अमिताभ बच्चन यांना अलीकडे बॅकिंगहम पॅलेसमध्ये होणाºया भारत-इंग्लड सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अमिताभ यांना निमंत्रण दिले होते. पण आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अमिताभ यांना या कार्यक्रमाला जाता आले नाही. पण अमिताभ नाही पण सुपरस्टार कमल हासन मात्र या कार्यक्रमाला पोहोचला. त्यालाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. त्यानुसार, त्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली. या भेटीचे काही फोटो कमल हासनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. कमलने लिहिले, राणी एलिझाबेथ द्वितीय यांना दुस-यांदा भेटीचा योग आला. त्यांना भेटून काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. राणी एलिझाबेथ द्वितीय भारत दौ-यावर आल्या तेव्हा त्या माझ्या चित्रपटाच्या सेटवर आल्या होत्या. कदाचित चित्रपटाच्या सेटला भेट देण्याची त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव घटना असावी. या भेटीत खूप कमी वेळासाठी राणी एलिझाबेथ यांना भेटता आले. त्यांची प्रकृती चांगली दिसतेय. एलिझाबेथ यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनीही भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. 1993 : राणी एलिझाबेथ द्वितीय भारत दौ-यावर आल्या तेव्हा त्यांनी सुपरस्टार कमल हासनच्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली होतीगत मंगळवारी बकिंगहम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ २ यांनी भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रम २०१७ चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकदिग्गज उपस्थित होते. कपिल देव, फॅशन डिझायनर मनीष अरोरा आणि मनीष मल्होत्रा, गायक-अभिनेता गुरदास मान आणि सितार वादक अनुष्का शंकर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.