Join us  

हृतिक रोशनला टक्कर, काळजात धडकी भरवणारा 'फायटर' मधील हा खलनायक आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 4:13 PM

'फायटर' चित्रपटातील खलनायकाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण  यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'फायटर' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे पण, या चित्रपटातील खलनायकाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे. चला जाणून घेऊया कोण आहे हा खलनायक. 

 'फायटर' सिनेमात ऋषभ साहनी या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. फायटरच्या आधी ऋषभ साहनी काही लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसला आहे. ऋषभ साहनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. तो आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

 पहिल्याच चित्रपटात ऋषभला हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत काम करण्याची संधी मिळाली.  फायटरच्या ट्रेलरमधूनच ऋषभ साहनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. ऋषभने अभिनेता हृतिक रोशन तगडी टक्कर दिली आहे.  देशभक्तीवरील या सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. 

'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याशिवाय या चित्रपटात अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'फायटर'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.  तर सिनेमाची निर्मिती ही वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली केली गेली आहे.  येत्या 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'फायटर' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूडअनिल कपूर