Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनला भेटण्यासाठी ‘ती’ झोपली फुटपाथवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 10:59 IST

सिने स्टार्सचे डाय-हार्ड फॅन्स त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी जीवाचा आटपीटा करणाऱ्या या ...

सिने स्टार्सचे डाय-हार्ड फॅन्स त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी जीवाचा आटपीटा करणाऱ्या या फॅन्सची अनेकदा निराशादेखील होते. असाच काहीसा अनुभव अर्जुन कपूरच्या एका चाहतीला आला.त्याचे झाले असे की, नाशिकहून एक मुलगी घरून पळून मुंबईला केवळ अर्जुनला भेटायला आली. त्याच्या घरासमोर ती चक्क दोन दिवस ठाण मांडून होती. सेक्युरिटी गार्ड्सकडे तिने जेव्हा अर्जुनला भेटण्याबद्दल विचारले तेव्हा तो शूटींगमध्ये व्यस्त असून पुढचे काही दिवस घरी येणार नाही, असे तिला सांगण्यात आले.यावर मात्र तिचे समाधान झाले नाही. ती तशीच त्याच्या घरासमोर दिवसभर वाट पाहत बसली. रात्र झाली तेव्हा ती घरी जाईल असे वाटले; मात्र अर्जुनसाठी काहीही पण करण्यासाठी तयारी असलेली ही चाहती तेथेच फुटपाथवर चादर ओढून झोपली.दुसऱ्या दिवशीसुद्धा तिने दिवसभर वाट पाहिली आणि मग ती निघून गेली. या सर्व प्रकाराची अर्जुनला काहीच खबर नव्हती. जेव्हा त्याच्या ड्राईव्हरने त्याला याबाबत सांगितले तेव्हा अर्जुनला फार वाईट वाटले. आपल्या फॅनला अशा वाईट अनुभवाला सामोरे जावे याचे त्याला दु:ख झाले.                                                                      डाय-हार्ड फॅन : अर्जुनला भेटण्यासाठी आलेली ही चाहती अशी फुटपाथवर झोपली होती.तो म्हणाला की, ‘तिच्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत आहे. कृपया करून त्या मुलीला सांगा की, मला तिला भेटायला आवडेल.  माझ्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी चंदीगडला जाण्यापूर्वी मी या आठवड्यात मोकळा आहे. सो आपण भेटू शकतो.’आता अर्जुनची ही विनंती तिच्यापर्यंत पाहेचते का आणि त्याला भेटण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होते का हे पाहणे रंजक ठरेल. तत्पूर्वी अनिस बझमी दिग्दर्शित ‘मुबारका’ या सिनेमात अर्जुनबरोबर काका अनिल कपूर, इलियाना डिक्रुज आणि अथिया शेट्टीसुद्धा असून पुढील वर्षी जुलैमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.