भेटा, अक्षय कुमारच्या अतरंगी चाहत्याला ; अक्कीला भेटायला आला होता हरिद्वारहून सायकलवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 11:31 IST
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी चाहते अतरंगी हरकती करत असतात. कुणी सेटवर सेलिब्रिटीचा पाठलाग करतात, कुणी निनावी पत्रं पाठवतात. मात्र, ...
भेटा, अक्षय कुमारच्या अतरंगी चाहत्याला ; अक्कीला भेटायला आला होता हरिद्वारहून सायकलवर!
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी चाहते अतरंगी हरकती करत असतात. कुणी सेटवर सेलिब्रिटीचा पाठलाग करतात, कुणी निनावी पत्रं पाठवतात. मात्र, ‘बॉलिवूडचा खिलाडी’ असलेल्या अक्षय कुमारचा एक चाहता अत्यंत अतरंगी असल्याचं कळतंय. हा चाहता अक्कीला भेटण्यासाठी हरिद्वारहून मुंबईला थेट सायकलवरून आला. मात्र, अक्षयने त्या चाहत्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून सर्व चाहत्यांना आवाहन केले आहे की, ‘मला भेटण्यासाठी कुणीही असे पाऊल उचलू नये. यामुळे तुमच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.’