Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रिपल तलाक’मुळे मोडला होता मीनाकुमारीचा संसार; तिची कथा वाचून तुम्हालाही रडू कोसळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 21:18 IST

आज सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवरून एका ऐतिहासिक निकाल दिला आहे. गेल्या कित्येक काळापासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेला निकाल अखेर आज ...

आज सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवरून एका ऐतिहासिक निकाल दिला आहे. गेल्या कित्येक काळापासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेला निकाल अखेर आज घोषित करण्यात आला अन् धाडसी मुस्लीम महिलांनी आपला विजय साजरा केला. ट्रिपल तलाकचा सर्वांत जास्त फटका अशिक्षित महिलांना बसत आला आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, याला बॉलिवूडची अभिनेत्री मीनाकुमारी हीदेखील बळी पडली आहे. ज्याकाळात मीनाकुमारीच्या नावाचा डंका वाजायचा त्याचकाळात तिला या दुर्दैवी घटनेचा सामना करावा लागला. त्याकाळात मीनाकुमारी टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. खूपच कमी काळात मीनाकुमारीला बॉलिवूडमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. तिचे लग्न दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाले होते. त्याकाळी मीनाकुमारीचे स्टारडम ऐवढे होते की, लोक कमाल अमरोही यांना त्यांच्या नावापेक्षा मीनाकुमारीचे पती या नावानेच अधिक ओळखायचे. याचाच परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही पडला. मीनाकुमारीच्या स्टारडममुळे कमाल ऐवढे त्रस्त झाले होते की, पुढे त्यांनी तिचे आयुष्य दु:खद केले होते. पुढे-पुढे तर आपले महत्त्व दाखवून देण्यासाठी कमाल मीनाकुमारीच्या चित्रपटांमध्येही हस्तक्षेप करू लागले. मीनाकुमारी ज्या चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार देत होती, त्या चित्रपटाला कमाल अमरोही विरोध करायचे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भाडणं, मारपीट होत असे. शिवाय दोघांमधील नात्यात वितुष्ट निर्माण झाले होते. मीनाकुमारीला मारपीट करणे नित्याचेच झाले होते. त्यामुळे ती पती कमाल यांच्यामुळे खूपच त्रस्त झाली होती. एक दिवस तर कमालने मीनाकुमारीला वाºयावर सोडण्याच्या विचाराने सर्व सीमाच पार केल्या. रागाच्या भरात कमाल अमरोही यांनी मीनाकुमारीच्या श्रीमुखात मारताना तिला तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हटले. मीनाकुमारीने कमालकडून याबाबतची कधी अपेक्षा ठेवली नव्हती. ती त्याचा त्रास सहन करायची, परंतु नवºयाने आपल्यापासून तलाक घ्यावा, असा तिने कधी विचारच केला नव्हता. पुढे ‘तलाक’च्या विचाराने ती नशेच्या आहारी गेली. यामुळे तिला खूप यातनाही सहन कराव्या लागल्या.