Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 62 व्या वर्षी मिनाक्षी शेषाद्रींनी केला जबरदस्त डान्स, 'बिग बीं'च्या गाण्यावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:35 IST

Meenakshi seshadri: मिनाक्षी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. या रीलमध्ये त्यांनी त्यांचं एक जुनं गाणं रिक्रिएट केलं आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत मिनाक्षी यांनी स्क्रीन शेअर केली. मात्र, आता त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहेत. अनेकदा त्या ट्रेंडिंग किंवा जुन्या गाण्यांवर हटके डान्स रिल्स शेअर करत असतात.

मिनाक्षी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. या रीलमध्ये त्यांनी त्यांचं एक जुनं गाणं रिक्रिएट केलं आहे. या गाण्यात त्याकाळी त्यांच्यासोबत अभिनेता अमिताभ बच्चन यांनी स्क्रीन शेअर केली होती.

मिनाक्षी यांनी १९८८ साली रिलीज झालेल्या 'शहंशाह' या सिनेमातील 'हे यू' हे गाणं रिक्रिएट केलं आहे. रिक्रिएट केलेल्या या गाण्यात त्यांनी लाल रंगाचा ऑफ शोल्डर कोर्सेट ड्रेस परिधान केला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी ज्या डान्स स्टेप्स केल्या आहेत ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

''हे यू..माझ्या करिअरमधील काही मोजक्या आयटम साँगपैकी एक हे गाणं ज्यावर मी परफॉर्म केलं होतं. शहंशाहच्या निमित्ताने मला माझ्या आवडत्या अभिनेत्यासोबत अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली होती. हे यू हे एक फूल पॅकेज होतं. ज्यात आशा भोसले यांनी हे गाणं गायल होतं. उत्तम सेट होता.गाण्यात आम्ही परिधान केलेले कपडे चांगले होते.आणि, सर्वोत्तम कोरिओग्राफरही आम्हाला लाभले होते'', असं मिनाक्षी यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,मिनाक्षी यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये या गाण्याविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. शहंशाह या सिनेमात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी यांनीदेखील स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा त्याकाळातील अनेक कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Meenakshi Seshadri, 62, stuns with dance on Amitabh Bachchan song.

Web Summary : Meenakshi Seshadri, a popular Bollywood actress, recently shared a dance reel on Instagram, recreating the song 'Hey You' from the movie 'Shahenshah'. Fans are amazed by her dance moves at 62, in which she starred alongside Amitabh Bachchan.
टॅग्स :बॉलिवूडमिनाक्षी शेषाद्रीअमिताभ बच्चनअमरिश पुरीसिनेमासेलिब्रिटी