चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर 'मयसभा - द हॉल ऑफ इल्युझन'च्या निर्मात्यांनी एका खास इव्हेंटमध्ये चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च केले आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. जावेद जाफरी आणि मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळत आहे. 'तुंबाड' या कल्ट क्लासिकनंतर 'मयसभा' हा दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा दुसरा चित्रपट आहे. आपली भावपूर्ण दृश्यभाषा आणि गुंतागुंतीच्या कथाकथन शैलीबद्दल प्रसिद्ध असलेले राही बर्वे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मानसिकतेमध्ये थेट प्रवेश करणार आहे. 'मयसभा - द हॉल ऑफ इल्युझन'मध्ये वेगळाच दृष्टीकोन आणि वास्तवाची प्रखर जाणीव बघायला मिळत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका जावेद जाफरी यांची असून त्यांच्या सोबत मोहम्मद समद, वीणा जामकर आणि दीपक दामले हे कलाकार आहेत. प्रत्येकाचा परफॉर्मन्स चित्रपटाच्या गुंतागुंतीच्या कथानकात भर घालतो आणि चित्रपटास अधिक उत्कट बनवतो.
Web Summary : Rahi Barve's 'Mayasabha - The Hall of Illusion' trailer is out, starring Javed Jaffrey and Veena Jamkar. Set to release January 30, 2026, the film promises a unique perspective and a stark sense of reality, exploring ideas that linger beyond the screen.
Web Summary : राही बर्वे की 'मयसभा - द हॉल ऑफ इल्यूजन' का ट्रेलर रिलीज हो गया है, जिसमें जावेद जाफरी और वीना जामकर हैं। 30 जनवरी, 2026 को रिलीज होने वाली यह फिल्म एक अनूठा दृष्टिकोण और वास्तविकता की भावना प्रदान करती है।