Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेच्या 'मयसभा'त 'ही' मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार, व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:21 IST

'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा नवीन सिनेमा 'मयसभा'चा पहिला व्हिडीओ; 'ही' मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

'तुंबाड'चा दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा आगामी सिनेमा 'मयसभा'ची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाची दमदार घोषणा झाली. इतकंच नव्हे, सिनेमातील जावेद जाफरीचा ओळखू न शकणारा लूक पाहायला मिळाला. अशातच 'मयसभा'चा पहिला व्हिडीओ राहीने सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला एक भयानक आवाज दिसतोय. या व्हिडीओसोबत राहीने सिनेमाची रिलीज डेट आणि कलाकारांची माहिती सांगितली आहे.

'मयसभा'चा पहिला व्हिडीओ

राही बर्वेने त्याच्या सोशल मीडियावर 'मयसभा'चा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मातीने माखलेली एक जागा दिसते. त्यानंतर जमिनीवर पडलेलं एक हेल्मेट दिसतं. पुढे एक आवाज ऐकू येतो. पुढे एका गाडीवरचं चिन्ह दिसतं. ''मैं रौंदूंगी तोहे... मैं रौंदूंगी तोहे'' असा धडकी भरवणारा आवाज दिसतो. पुढे सिनेमाचं टायटल समोर येतं. 

ही मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत'मयसभा' सिनेमात जावेद जाफरी प्रमुख भूमिकेत आहे. जावेदसोबत मराठी अभिनेत्री वीणा जामकर या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय 'तुंबाड'मध्ये दिसलेला बालकलाकार मोहम्मद समद आणि अभिनेते दीपक दामले सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुंबाड'नंतर  'मयसभा' या दुसऱ्या सिनेमातूून राही बर्वे काय कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमाचा हा पहिलाच व्हिडीओ खतरनाक असून सर्वांना हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tumbbad Director's 'Maysabha' features Marathi actress in lead role.

Web Summary : Rahi Barve's 'Maysabha' unveils a chilling first look. Javed Jaffrey stars alongside Marathi actress Veena Jamkar, child actor Mohammad Samad, and Deepak Damle. Releasing January 19, 2026, the film promises a thrilling cinematic experience after 'Tumbbad'.
टॅग्स :तुंबाडजावेद जाफरीवीणा जामकरबॉलिवूडमराठी चित्रपट