ओटीटीवर सध्या एकापेक्षा एक अशा विविध आशयाच्या वेबसीरिज पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'मटका किंग'. सध्या सगळीकडे 'मटका किंग' या वेबसीरिजची प्रचंड चर्चा आहे. ही सीरिज नुकतंच प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मटका किंग'मध्ये अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरदेखील झळकली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईने विजयसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला असून, त्याच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
'मटका किंग'च्या टीमनं नुकतंच अमर उजालाला मुलाखत दिली. या मुलखतीमध्ये सई म्हणाली, "सीरिजमध्ये विजयसोबत माझे अनेक महत्त्वाचे सीन्स आहेत. शूटिंगदरम्यान कधी कधी विजय इतका अप्रतिम अभिनय करायचा की, त्याच्याकडे पाहत असताना मीच विसरून जायचे की मला काय करायचं आहे. मला नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची आहे किंवा मी त्या सीनसाठी काय तयारी केली आहे, हे देखील माझ्या लक्षात राहायचे नाही".
पुढे ती म्हणाली, "तो इतका अप्रतिम परफॉर्म करतो. तो एखादा छोटासा लूक देतो किंवा एखादी छोटीशी कृती करतो, पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. मी त्याच्याकडून खूप काही शिकले आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा मी काही काम करेन, तेव्हा त्याच्याकडून शिकलेल्या सगळ्या गोष्टी नक्की वापरण्याचा प्रयत्न करेन", असं ती हसत म्हणाली.
काय आहे 'मटका किंग'ची कथा?
ब्रिज भट्टी (विजय वर्मा) एक हुशार कापूस व्यापारी असून १९६० च्या दशकातील नव्या भारतातील मुंबईमध्ये चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहतो. एका दमदार कल्पनेच्या जोरावर तो जुगाराला श्रीमंतांच्या छंदातून मोठ्या चळवळीत बदलतो आणि 'मटका'चा जन्म होतो. 'मटका किंग' ही सीरिज एका अशा जगात घेऊन जाते, जिथे 'मटका' हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.
Web Summary : Sai Tamhankar praises Vijay Varma's captivating performance in 'Matka King'. She admitted to being so engrossed in his acting that she forgot her lines. The series explores the world of 'Matka', a game of chance intertwined with power and society.
Web Summary : सई ताम्हणकर ने 'मटका किंग' में विजय वर्मा के शानदार अभिनय की प्रशंसा की। उन्होंने स्वीकार किया कि वह उनकी एक्टिंग में इतनी तल्लीन हो गई थीं कि अपनी लाइनें भूल गईं। यह श्रृंखला 'मटका' की दुनिया का पता लगाती है, जो शक्ति और समाज के साथ जुड़ा हुआ एक मौका का खेल है।